किसान क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी वेळेत परतावा केल्यास व्याजदरही घटणार! - Maha News K

this is marathi news website.new trending news website.

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

किसान क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी वेळेत परतावा केल्यास व्याजदरही घटणार!

 किसान क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी : योजना एक अन् फायदे अनेक, वेळेत परतावा केल्यास व्याजदरही घटणार!


शेती व्यवसयामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे गुंतवणूक. मात्र, या ठिकाणीच शेतकऱ्यांची अडचण होते. आतापर्यंत विविध योजना आणि अनुदानातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे पण आता  कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट बॅंक कर्जही मिळणार आहे. शिवाय वेळेत  कर्जाची परतफेड आणि नूतनीकरण म्हणजेच ग्रामीण भागात नवं-जुनं केले तर अधिकचा फायदा होणार आहे.


ज्या शेतकऱ्यांना ते जमत नाही त्यांना अनुदानाचा लाभ मिळत नाही आणि कर्जाच्या व्याजासह दंड आकारला जातो. त्या केसीसीच्या खात्यावरील व्याजदर 7 टक्क्यांऐवजी 9 टक्क्यांवर जातो. दरवर्षी हा व्याजदर वाढतच जातो. काही बाबतीत आणि बँकांमध्ये तीन वर्षांनंतर व्याजदर 14 टक्क्यांपर्यंत पोहोचतो. या कार्डवर घेतले जाणारे कर्ज हे वेळेत भरले तरच याचा फायदा होतो.


त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट न पाहता वेळेत हप्ते जमा केले तर अधिकचा फायदा होणार आहे. केवळ 7 टक्के व्याजदराने 3 लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना ते ही सहा महिन्यासाठी.


याकरिता 31 मे 30 नोव्हेंबर असा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. नूतनीकरण म्हणजेच नवं-जुनं केले तर 3 टक्के व्याज हे अनुदान म्हणून शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे केवळ 4 टक्के व्याजदरानेच शेतकऱ्यांना हे पैसे वापरायला मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी नियम अटींचे पालन केले तर हे कार्ड शेतकऱ्यांना व्यवसाय वाढीसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.


नियमित कर्ज हप्ता अदा केल्यास फायदा..

अनेक वेळा केसीसीचे कर्ज भरण्यात शेतकरी चालढकल करतात. एवढेच नाही तर स्थानिक पातळीवर कर्जमाफीचे आश्वासनही नेते मंडळी दोतात. यामुळे शेतकरी नियमित व्याज अदाच करीत नाहीत.


त्यामुळे बॅंकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक वेळा दंड, व्याज, वसुली खर्च, कायदेशीर शुल्क यासह अनेक शुल्क जोडून बँका खातेदाराकडून पैसे आकारतात. त्यामुळे KCC कार्डवर घेतलेले कर्ज सरकार कधीही माफ करीत नाही त्यामुळे नियमित अदा करुन अनेक सुविधांचा लाभ हाच महत्वाचे असल्याचे तज्ञ सांगत आहेत.


हे पण वाचा:-Pm kisan Yojan : पीएम किसान योजना मध्ये महत्वपूर्ण बदल, ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाही आता लाभ 2022

केसीसीचे कर्ज फेडण्याचे गणित

समजा एखाद्या शेतकऱ्याने 3 लाख रुपयांचे केसीसी कर्ज घेतले आणि त्याचे तीन वर्षांसाठी वेळेत नूतनीकरण केले तर त्याने 4 वर्षात 12000X4 = 48000 रुपये इतके व्याज दिले, तर जर एखाद्या शेतकऱ्याने कर्जमाफीच्या प्रतिक्षेत चार वर्षे एक रुपयाही भरला नाही तर पहिल्या वर्षी त्याचे व्याज 3000000 रुपयांच्या 7 टक्के असेल 21000 रुपये होते. म्हणजेच 1 वर्षानंतर व्याजाची रक्कम ही 3 लाख 21 हजार होते तर दुसऱ्या वर्षी 9 टक्के दराने व्याज आकारले जाते. म्हणजेच 3 लाख 21 हजावर 9% ने दुसऱ्या वर्षी 28890 होईल. अशा प्रकारे दुसऱ्या वर्षानंतर मुळ व्याजाची रक्कम ही 3 लाख 49 हजार 890 एवढी होते. तिसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षाच्या मुद्दलमध्ये व्याज आकारण्यात येते तर मूळ रकमेवर तिसऱ्या वर्षी 11 व्याज आकारले जाते. अशा प्रकारे 3 लाख 49 हजार 890 पैकी 11 टक्के म्हणजेच 38487 हे केवळ व्याज असणार आहे. तर चौथ्या वर्षी तिसऱ्या वर्षाच्या मुद्दलावर 14 टक्के व्याज आकारले जाते. अशा प्रकारे चौथ्या वर्षी व्याज 87 हजार 472 इतके होणार असून मूळ कर्जाची रक्कम ही 4 लाख 75 हजार 849 एवढी होणार आहे. त्यामुळे वेळेत कर्ज अदा करणेच फायद्याचे राहणार आहे.


केसीसी कर्ज वेळेवर फेडण्याचे फायदे

वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला व्याजापोटी 48 हजार रुपये द्यावे लागत होते. मात्र, ज्या शेतकऱ्याकडून वेळेवर पैसे दिले नाहीत, त्या शेतकऱ्याला व्याजापोटी 1 लाख 75 हजार 849 अदा करावे लागतात. त्याचबरोबर बँकेने आकारलेले दुसरे शुल्क या रकमेत जोडले तर ही रक्कम सुमारे 2 लाख 50 हजाराच्या घरात जाते. याशिवाय तुमचा सिबिल स्कोअरही खराब होतो, ज्यामुळे तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

nickfinder Aaj Ka Mousam Mousam Ki Jankari Marathimadhe

Apali yojna

Hindi Ki info

nickfinder